Maharashtra Budget 2024 : राज्यात महिलांना मिळणार १५०० रुपये, शिंदे सरकारची नवी योजना जाहीर, अजित पवारांची मोठी घोषणा


Maharashtra Budget 2024 : राज्यातील महायुती सरकारकडून शुक्रवारी त्यांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. विधान सभेच्या तोंडावर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींची घोषणा करण्यात आली. तसेच अजित पवारांनी माझी लाडकी योजना जाहीर केली. अजित पवारांनी 2024-25 साठी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. Maharashtra Budget 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरु करत आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दिड हजार रुपये दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला ४६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे…

२०२४-२५ वर्षाचा अतिरिक्त अर्थ संकल्प सादर करतोय, असं म्हणत अजित पवारांनी संत तुकारामांचा अभंग सादर करत बजेट मांडायवा सुरुवात केली.

विठ्ठलाच्या दर्शनाला दिंड्या निघाल्या आहेत, ही हजार वर्षांची परंपरा आहे. भक्तिमार्गाची नाळ जोडल्याची जाणीव महाराष्ट्राला आहे. युनेस्को कडे नोंद व्हावी म्हणून प्रस्ताव पाठवत आहोत. असं देखील अजित पवार म्हणाले.

देहू आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील सर्व वारकऱ्यांची तपासणी केली जाणार आहे पालखी महामार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!