Maharashtra Band : महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, महाविकास आघाडीला हायकोर्टाचा दणका, बंद पुकारणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश….


Maharashtra Band : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली.परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने आज या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय देत, अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा आहे आणि कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयाने मविआला मोठी चपराक लगावली आहे. मविआने उद्या पुकारलेला बंद मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला उद्या बंद करण्यासाठी हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे.

जर कोणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमुर्ती अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला आहे. Maharashtra Band

या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, न्यायालयाच्या निर्देशाचे पालन राज्य सरकार करेल. शिंदे यांनी असे सांगितले की, या प्रकारच्या बंदामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतो आणि त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन सुनिश्चित केले जाईल.

दरम्यान, महाविकास आघाडीने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ हा बंद पुकारला होता. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी या बंदसाठी लोकांना आवाहन केले होते. ठाकरे यांनी हा बंद राजकारणासाठी नसून समाजातील विकृतींविरुद्ध असल्याचे सांगितले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!