Maharashtra Assembly Election : ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आता आक्रमक! घेतला मोठा निर्णय…


Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप अनेक पडलेल्या उमेदवारांनी केला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून कायदेशीर लढाई लढणार असल्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेतेही ईव्हीएम विरोधातील भूमिकेवर एकमताने पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

कारण, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत आमदारांची मंगळवारी (ता. २६) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पराभूत आमदारांनी निकालावर संशय व्यक्त करत ईव्हीएमच्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर संशय व्यक्त केला आहे.

त्यानंतर, पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत ईव्हीएम विरोधात ठोस भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, ईव्हीएम विरोधातील लढाईसाठी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. Maharashtra Assembly Election

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे १ लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले असूनही त्यांनी ईव्हीएमला प्रकर्षणाने विरोध दर्शवला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वकिलांची एक मोठी टीम कायदेशीर लढाई लढण्यासाठी नेमणार आहे.

तसेच शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठे आंदोलन उभे करण्यात निर्णय घेतला आहे. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांनीही ईव्हीएम हटावची मोहीम देशभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!