Maharashtra Assembly Election 2024 : पूर्व हवेलीत सोलापूर रस्त्याच्या पट्यात रात्री आठ वाजेपर्यंत काही गावांत मतदान सुरू; चुरशीने झालेल्या मतदानाने उमेदवाराची धाकधूक वाढली…


उरुळीकांचन : पूर्व हवेली तालुक्यात पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरुर -हवेली विधानसभेसाठी अत्यंत चुरशीने मतदान संपन्न झाले आहे. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या लोणी काळभोर ,कदमवाकवस्ती व उरुळीकांचन ग्रामपंचायतीने ६० % मतदानाचा आकडा ओलंडला असून लोकसंख्येंने छोट्या ग्राम – पंचायतीत चुरशीने ७० % मतदानाचा टप्पा ओलंडल्याने हा भाग कोणत्या उमेदवाराच्या पदरात आपले दान टाकतो म्हणून शिरुर -हवेली विधानसभेचा निकाल अवलंबून असणार आहे.

शिरूर-हवेली विधानसभेसाठी पूर्व हवेली तालुक्यात बुधवारी (दि.२०) सकाळी सात वाजल्यापासून मतदारांत मोठा उत्साह जाणवला असून नागरीक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले असल्याचे चित्र या भागात जाणवत होते. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या उरुळीकांचन, लोणीकाळभोर व कदमवाकवस्ती येथे मतदारांनी सकाळी थोडी धिमी सुरुवात केलीअसली तरी सकाळी ११ नंतर मतदानाचा वेग आला.दुपारी महिला वर्ग बाहेर पडल्याने मतदानाच्या रांगा लावून मतदानाचा हक्क बजावत होते. Maharashtra Assembly Election 2024

सोलापूर रस्त्यावर पुणे ग्रामीण पोलिस व पुणे शहर पोलिसांनी आपल्या हद्दीत स्थानिक पोलीस व सीआयएसएफ विशेष पथक बंदोबस्त करण्यासाठी तैणात करण्यात आले होते.संवेदनशील मतदान केंद्र असलेल्या सोरतापवाडी , उरुळीकांचन या ठिकाणी पहिल्यांदाच केंद्रीय सीआयएसएफ चे जवान मतदान केंद्रावर तैनात होते. सायंकाळी ६ नंतर थेऊर , लोणीकाळभोर व कदमवाकवस्ती येथे सायंकाळी ७.३० पर्यंत मतदान सुरू होते. तर उरुळीकांचन या मोठ्या ग्रामपंचायतीत एक केंद्र वगळता सहा वाजल्याच्या नंतर मतदान प्रक्रीया बंद झाली. या सर्व मतदान प्रक्रियेत महिला वर्गाने मोठी उपस्थिती लावून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त….

उरूळीकांचन पोलिस ठाण्यात मतदानादिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने मतदान प्रक्रिया अतिशय सुरळीत पार पडली. या निवडणुकीत विशेष म्हणजे केंद्रीय सीआयएसएफ चे जवान तैनात करण्यात आल्याने त्यांनी कडक शिस्तीत मतदान केंद्रावर बंदोबस्त ठेवल्याने वाहतूक कोंडी अथवा इतर तुरळक घटनांवर नियंत्रण ठेवण्यात आले.

मतदारांच्या सुविधांचा अभावच ?

निवडणूक आयोगाने मतदारांचा टक्का वाढावा म्हणून निरनिराळे उपक्रम राबविताना मतदारांना प्रोत्साहित केले होते. मतदारांना मतदानाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी हे प्रयत्न होते. मात्र मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या बिएलओ यांनी मतदारांच्या चिठ्ठ्या मतदारांपर्यंत पोहचविल्या नसल्याने वास्तव आहे. त्यामुळे मतदारांना यादीत नाव शोधण्याची वेळ येऊन मतदान केंद्रावर उशीर होत होता. तसेच निवडणूक आयोगाने दिव्यांगासाठी रँम्प ,अपंगांसाठी स्वयंसेवक ,महिलांसाठी पाळना घर आदी सुविधा केंद्रावरील अधिकाऱ्यांना माहितीच नसल्याची स्थिती होती.त्यामुळे मोबाईल फोन केंद्रावर प्रतिबंध करण्यापलिकडे अधिक काही झाले नसल्याची परिस्थिती होती.

या भागात झालेल्या गावनिहाय टक्केवारी…

लोणी काळभोर – ६८.२० %
कदमवाकवस्ती – ६५.५0%
थेऊर – ६९%
कुंजीरवाडी – ७४.८०%
आळंदी म्हातोबा – ७२.२७%
सोरतापवाडी -६७.८२%
तरडे – ८०.२८%
उरुळी कांचन – ६०.४२%
कोरेगाव मूळ – ६५.७८%
टिळेकरवाडी – ७०%
नायगाव – ८०.५६%
पेठ – ७९%
भवरापूर – ८१%
शिंदवणे – ७३.३७%
वळती – ७०%
प्रयागधाम -६०%
खामगावटेक -७०%

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!