Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 41.70 टक्के मतदान, जाणून घ्या तालुकानिहाय टक्केवारी…

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 4 हजारांहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तसेच पुणे जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 41.70 टक्के मतदान झाले आहे. Maharashtra Assembly Election 2024
पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे…
जुन्नर – 49.29 टक्के , अबेगाव – 49.55 टक्के, खेड आळंदी – 47.43 टक्के , शिरूर – 43.60 टक्के , दौंड – 46.70 टक्के, इंदापूर – 49.50 टक्के, बारामती – 43.57 टक्के, भोसरी – 43.16 टक्के, पुरंदर – 40.32 भोर – 43.57 टक्के, मावळ – 49.75 टक्के, चिंचवड – 40.43 टक्के, पिंपरी – 31.58 टक्के , वडगाव शेरी – 38.83 टक्के , शिवाजीनगर – 33.86 टक्के, कोथरूड – 37.80 टक्के , खडकवासला – 40.40 टक्के, पर्वती – 37.66 टक्के , हडपसर – 33.78 टक्के , पुणे – 35.84 टक्के कसबा पेठ – 43.03 टक्के.
