Mahanand Dairy : राज्यातील अजून एक सहकारी उद्योग गुजरातला पळवला!! आता महानंद डेअरीवर गुजरातच्या मदत डेअरीचा ताबा…

Mahanand Dairy : महाराष्ट्रातील महानंद डेअरी अखेर इतिहासजमा झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद या राज्यातील प्रसिद्ध डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीने कब्जा मिळवला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकारण या मुद्द्यावर देखील पेटण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महानंद डेअरी गुजरातच्या अमूल डेअरीकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचा आरोप विरोधकांकडून राज्य सरकारवर करण्यात येत होता. मात्र आता ही डेअरी अमूलकडे न जाता तीमदर डेअरी या दुध व्यवसायातील मोठ्या ब्रँडकडे गेली आहे.
महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया २ मे रोजीच पूर्ण झाली असून याचे वृत्त आज बाहेर आले आहे. त्याचबरोबर महानंदला पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून मदर डेअरीला तब्बल २५३ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे.
गुजरातच्या मदर डेअरी या मोठ्या दूध प्रक्रिया उद्योगाने महानंद डेअरीचा ताबा आता घेतला असून त्याची हस्तांतरण प्रक्रिया देखील पूर्ण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. Mahanand Dairy
दोन मे रोजीच हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून या महानंदाच्या पुनरूज्जीवनासाठी राज्य सरकारच मदर डेअरीला 235 कोटींचे अर्थसहाय्य करणार असल्याचे देखील माहिती मिळत आहे.
पाच वर्षासाठी करार असल्याची माहिती मिळत असून केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने हा करार करत मदर डेअरीकडे महानंदाचा ताबा सोपवला आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून या संस्थेचा हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेत होता. या हस्तांतरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्दावरून एकमेकांवर आरोप केले होते.अनेक आरोप व प्रत्यारोपानंतर मदर डेअरीने महानंद डेअरीवर ताबा मिळवला. महानंद डेअरीवर आता गुजरातच्या मदर डेअरीची मालकी आली आहे. याची हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.