महाकुंभ मेळ्याची आज सांगता, किती कोटी लोकांनी केले स्नान? पुढील महाकुंभ कुठे होणार? जाणून घ्या…


प्रयागराज : उत्तर प्रदेश येथील महाकुंभाचे आज महाशिवरात्री दिवशी समारोप होणार आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभात लाखोंच्या संख्येने लोक आले आहेत. आज सकाळी ६ वाजेपर्यंत ४१ लाख लाकांनी गंगा नदीत पवित्र स्‍नानाची पर्वणी साधली आहे.

या स्‍नानासोबत प्रयागराजमधील यंदाच्या महाकुंभाचा समारोप होणार आहे. अशावेळी लाखो लोकांना हा प्रश्न पडला आहे की, पुढचा कुंभमेळा केंव्हा आणि कुठे भरणार? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. याबाबत आता माहिती समोर येत आहे. पुढचा महाकुंभ हा हरिद्वारच्या गंगेच्या किणाऱ्यावर भरणार आहे.

हा कुंभमेळा दोन वर्षात २०२७ साली लागणार आहे. त्‍याला अर्धकुंभ २०२७ च्या नावे ओळखले जाणार आहे. त्‍यासाठी आतापासूनच उत्तराखंड सरकारने तयारीला सुरूवात केली आहे. या वर्षीच्या महाकुंभ मेळ्यात सुमारे 62 कोटी लोकांनी पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान केले.

हे एक अतिशय मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभ आहे, जेथे एकाच वेळी लाखो लोक एकत्र येतात. मेळ्याच्या प्रमुख दिवशी 10 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. हा एक अद्भुत अनुभव होता, जो संपूर्ण जगभरातून लोकांना आकर्षित करतो. विदेशातूनही अनेक लोक याठिकाणी दाखल झाले होते. प्रयागराजमध्ये पुढील महाकुंभ २०३७ मध्ये होईल, जो १२ वर्षांचा उत्सव चालू ठेवेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!