राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदनदास देवी यांचे निधन; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…


पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१ वर्षे) यांचे सोमवार (२४ जुलै) रोजी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (२५ जुलै) रोजी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आदरणीय मदनदासजी देवी यांचा जन्म ९ जुलै रोजी झाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे त्यांचे मूळ गाव. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी १९५९ मध्ये प्रवेश घेतला.

एम. कॉमनंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवत त्यांनी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली.

पुण्यात शिक्षण घेत असतानाच वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने त्यांचा रा. स्व. संघाशी संबंध आला. मदनदास देवी यांनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. आयुष्यातील जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सह सरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला.

मदनदासदेवी यांचे पार्थिव सोमवारी रात्रीपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत पार्थिव मोतीबागेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरसंघचालक मा. डॉ.मोहन भागवत आणि सरकार्यवाह मा. दत्तात्रेय होसबाळे यावेळी उपस्थित राहतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!