मदनदास देवी म्हणजे अखंड स्थितीचा निर्धारु, मोहन भागवत यांच्याकडून मदनदास देवी यांना श्रद्धांजली अर्पण..


पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे सोमवारी बंगरुळू येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव पुणे येथील संघाच्या मोतीबाग कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोहनदास देवी यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, हजारो लोकांना वात्सल्य आणि प्रेमाने बांधून ठेवण्याची हातोटी असलेले मदनदास देवी म्हणजे अखंड स्थितीचा निर्धारु असेच त्यांचे वर्णन करता येईल.

चार्टड अकाऊंटंट असून त्यांनी आपले संपुर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघालासाठी दिले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, केंदीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंदीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी संघाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

मदनदास देवी याची बुद्धीमता वाखाणण्याजोगी होती. सीए असूनही त्यांनी संघकार्यात स्वतःला झोकून दिले. त्यांना ज्यांचा सहवास लाभला ते भाग्यवान आहेत, असेही मोहन भागवत म्हणाले.

त्यांच्या प्रेमापोटी इतके लोक देशभरातून इथे आले आहेत. त्यांचे जीवन म्हणजे बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू असेच होते, असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!