लग्नाचे अमिष दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार ! दौंड मधील घटना…!

दौंड : विवाहित महिलेला सोशल नेटवर्कच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लॉजवर नेऊन शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी एका नराधमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपी मयुर रमेश भोसले (दौड जि.पुणे.) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याच्या शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडित महिला व आरोपी मयुर भोसले या दोघांची डिसेंबर २०२१ मध्ये सोशल नेटवर्किंग च्या साइटवरून ओळख झाली होती. तेव्हा पिडीत महिलेने आरोपी भोसले यास सांगितले होते कि, माझे लग्न झाले असून मला एक लहान मुलगी आहे. तेव्हा आरोपी भोसले म्हणाला, तुझा आणि तुझ्या पतीचा घटस्फोट झाला, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली की, मी तुझ्याशी लग्न करतो. असे आश्वासन आरोपीने पिडीत महिलेला दिले होते.

याचदरम्यान, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पिडीत विवाहितेला दौंड परिसरातील लॉजवर नेले. आणि कोल्ड्रींक्समध्ये गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी शारीरीक सबंध ठेवले. तसेच त्या क्षणांचे फोटो व व्हिडीओ काढले. त्यानंतर पिडीत महिलेने पतीचा घटस्फोट घेतल्यानंतर लग्नाबाबत आरोपी भोसले याला विचारले असता, घरच्यांना विचारून आपण लग्न करू असे सांगितले.
तत्पूर्वी, भोसले याने अचानकच दुसऱ्यामुलीसोबत लग्न केले.याबाबत पिडीत विवाहितेने आरोपी भोसले याला विचारले असता, मी आता काही करू शकत नाही व आमच्या घरच्या व्यक्तींपुढे जाऊ शकत नाही, त्यावरून या दोघांमध्ये भांडणे झाली. आरोपीने पिडीत महिलेच्या घरी जाऊन तिला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच वडीलांनाही शिवीगाळ व दमदाटी केली आणि जर घडलेला प्रकार जर तू कोणाला सांगितला तर मी तुझे आणि माझे सोबतचे फोटो सोशल मिडीयावर टाकील. आणि तुला आणि तुझ्या मुलीलाजिवे मारून टाकीन. अशी धमकी आरोपी भोसले यांने दिली. असे पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, आरोपी मयुर भोसले हा फरार झाला आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.