पशुपालकांनो काळजी घ्या! राज्यात पुन्हा वाढला लम्पीचा प्रादुर्भाव…


पुणे : लम्पीने पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे पशुपालकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडेत येथे या आजाराने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

याठिकाणी आजाराने चार जनावरांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात पुन्हा लम्पीचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण, औषध फवारणी केली जात आहे. यामुळे प्रशासन देखील सावध झाले आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक जनावरांना हा आजार जडला होता. त्यामुळे पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यामुळे चिंता व्यक्त केली जात होती.

जनवारांच्या गोठ्यातील माशी, गोमाशी आणि घाणीमुळे या आजाराची लागण होते. हा आजार काही प्रमाणात आटोक्यात आला होता. आता मात्र पुन्हा एकदा त्याने डोकं वर काढले आहे.

येथील कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील जवळपास 40 ते 50 जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी जनावरे खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून केले आहे.

परंतु यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान यामुळे होत आहे. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!