मोठी बातमी! LPG चा तुटवडा संपणार, गॅस पुरवठ्यासाठी कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय….


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर गॅस टंचाई निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे जगात कच्चे तेल आणि गॅसची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे परिस्थिती अवघड झाली आहे. आता अमेरिकेतून एलपीजी आयात सुरू केली गेली आहे.

होर्मुझ सामुद्रधूनीवर इराणने वाहतूक बंदी लादल्याने अनेक देशांना तेल, गॅसचा तुटवडा जाणवत आहे. भारताने एलपीजी पुरवठा वाढवण्यासाठी नवीन स्रोतांमधून एलपीजी खरेदी सुरू केली आहे. भारताची बहुतेक एलपीजी पुरवठा आखाती देशांकडून येत आहे.

आता तेल विपणन कंपन्यांनी अमेरिकेमधूनही एलपीजी घेण्यास सुरुवात केली आहे. सर्वाधिक LPG आखाती देशांमधून येतो, परंतु आमच्या OMC ने आता अमेरिकेतूनही LPG घेण्यास सुरुवात केली आहे. पुरवठा वैविध्यीकरणामुळे भारताला आता पूर्वीपेक्षा अधिक कच्चे तेल मिळत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारचा उद्देश आखाती देशांवरील अवलंबित्व कमी करणे आणि ऊर्जा पुरवठा स्थिर ठेवणे आहे. कमर्शियल LPG पुरवठा, काही वेळासाठी थांबवण्यात आला होता, आता अंशतः पुन्हा सुरू झाला आहे. अनेक राज्यांमध्ये याचे वितरण पुन्हा सुरू झाले आहे. येणाऱ्या काळात टंचाई कमी होण्याची शक्यता आहे.

घरगुती LPG ची मागणी कमी करण्यासाठी सरकारने केरोसीन आणि कोळसा यांसारख्या वैकल्पिक इंधनांचा वापर सुरू केला आहे. आखाती देशांतून दोन जहाजे सुरक्षितपणे पाहचली आहेत. तब्बल 46000 टन एलपीजी असलेले शिवालिका जहाज 16 मार्चच्या सायंकाळी मुंद्र पोर्टवर पोहचले.

यामध्ये तब्बल 32 लाखांपर्यंत सिलेंडर भरले जाऊ शकतात. तर 17 मार्च रोजी पहाटे नंदा देवी हे जहाज जामनगरमधील वाडीनार बंदरावर पोहचले. यामुळे आता केंद्र सरकारने हालचाल सुरू केल्याचे दिसून येत असून पुरवठा कधी सुरू होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!