LPG Price : महागाईने गाठला उच्चांक! आता आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत झाली मोठी वाढ…

LPG Price : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांच्या खिशाला फटका बसला. १ मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारचा मोठा धक्का बसला आहे.
मुंबईसह अहमदाबाद, मेरठ, इंदूर, लखनौ, दिल्ली, जयपूर,आग्रा संपूर्ण देशात सिलिंडरचे दर महाग झाले आहे. पण हे लक्षात घ्या की १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले असून मागील ऑगस्टपासून १४.२ किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांना दिलासा दिला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत.
आजपासून दिल्ली आणि मुंबईत एलपीजी सिलिंडर २५.५० रुपयांनी महाग झाले आहेत. कोलकात्यात 24 रुपये आणि चेन्नईमध्ये 23.50 रुपयांची वाढ झाली आहे. तेल विपणन कंपन्यांकडून आज LPG ते ATF दर अपडेट केले आहेत.
दरम्यान, नवीन दरानुसार आज दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडर ११७६९.५० रुपयांऐवजी १७९५ रुपये, कोलकातामध्ये सिलिंडर १८८७ रुपयांऐवजी १९११ रुपये, मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचे दर १७४९रुपये झाले असून चेन्नईत हे दर १९६० रुपये झाले आहे.
दरवाढीचा परिणाम..
व्यावसायिक गॅस महागल्याचा थेट परिणाम खाद्यउद्योगांवर दिसून येतो. हॉटेलिंग आणि फूड डिलिव्हरी महागली आहे. रेस्टॉरंटमध्ये पण खाद्यपदार्थ्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी बाहेरील खाद्यपदार्थांसाठी आता अधिक पैसा मोजावा लागणार आहे.