LPG Price : दिवाळीत महागाईचा दे धक्का! LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवीन दर…


LPG Price : लक्ष्मीपूजनादिवशीच एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार तर आहेच पण खिशाला चांगलीच कात्रीही लागणार आहे.

तसेच १ नोव्हेंबर रोजी पहाटे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला. पहिल्या नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या ताज्या दरानुसार आता हे गॅस सिलिंडर लोकांसाठी ६२ रुपयांनी महाग झाला आहे. मात्र, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. LPG Price

दरम्यान, तेल कंपन्यांनी एटीएफच्या किमती वाढवल्या आहेत, ज्यामुळे हवाई भाडेही महाग होत असल्याचे संकेत मिळत आहेत. दिल्लीमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडर १८०२ रुपये असेल तर कोलकातामध्ये या किमती १९११.५० रुपयांवर पोहोचल्या आहेत.

मुंबईत कमर्शियल गॅस सिलिंडर १७५४.५० रुपयांना मिळणार आहे. तर चेन्नईमध्ये १९६४.५० रुपये किंमत आहे. मागच्या काही महिन्यांपासून सतत्याने कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत आहेत.

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG चे दर बदलत असतात. सुदैवानं मार्चनंतर घसगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 803 तर मुंबईत ८१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!