LPG Cylinder : दिवाळीआधी गरिबांना मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी! आता ६०० रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर


LPG Cylinder नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या सबसिडीमध्ये २०० रुपयांऐवजी ३०० रुपये एवढी वाढ केली आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना ६०० रुपयांत घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे. LPG Cylinder

३७ दिवसांत मोदी सरकारने दुसऱ्यांदा दर कमी केले आहेत. ज्याचा फायदा १० कोटी लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. तत्पूर्वी २९ ऑगस्टला सरकारने २०० रुपये गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते. ज्याचा फायदा देशातील सर्वच ग्राहकांना झाला होता.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केले होते.

सिलिंडरची किंमत ११०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी झाली होती. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना सिलिंडर मिळत होता. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सिलिंडर अवघा ६०० रुपयांना मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!