LPG Cylinder : ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका! गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ..

LPG Cylinder मुंबई : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. आधीच महागाईच्या झळा सोसत असलेल्या सामान्यांना गॅस सिलिंडरच्या दरवाढीने आणखी मोठा दणका बसला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २०४ रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर रविवारपासून म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहेत. LPG Cylinder

तेल वितरण कंपनीच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आज पासून १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर २०९ रुपयांनी महाग मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव आणि दसऱ्यासारखे सण आहेत. अशातच तेलाच्या किंमती वाढवल्याने याचा सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे.

तसेच २०९ रुपयांच्या दरवाढीनंतर नवी दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १७३१.५० रुपये इतकी होणार आहे. गेल्या महिन्यात १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५७ रुपयांची कपात करण्यात आली होती. आता एका महिन्यातच गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.