LPG Cylinder : नवीन वर्षात सरकारने दिले सर्वसामान्य लोकांना मोठं गिफ्ट, एलपीजी गॅस झाला स्वस्त, जाणून घ्या..
LPG Cylinder : महागाई तसेच इंधन दरवाढीत होरपळून निघालेल्या जनतेला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी मिळाली आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. ही कपात फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरचे दर जसे होते तसेच आहेत.
तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करत असतात. गेल्या महिन्यात केंद्राने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३०.५० रुपयांची कपात केली होती. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता.
महिनाभरात दुसऱ्यांदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली आहे. आकडेवारीवर विश्वास ठेवला तर देशाची राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत १. ५ रुपयांनी कमी होऊन १७५५.५० रुपयांवर आली आहे. LPG Cylinder
तर कोलकातामध्ये गॅस सिलिंडरच्या दरात ५० पैशांनी वाढ झाली असून त्याची किंमत १८६९ रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर १.५० रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत १७०८.५० रुपयांवर आली आहे.
दक्षिण भारतातील सर्वात मोठे महानगर असलेल्या चेन्नईमध्ये सर्वात जास्त ४.५ रुपयांनी घट झाली असून व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1924.50 रुपये झाली आहे.
दरम्यान, यावेळी मात्र, व्यावसायिक सिलिंडरचे दर फक्त काहीच रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १.५० रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत १७०८.५० रुपयांवर आली आहे.