Love Jihad Law : योगींनी आणला आणखी एक कठोर कायदा! उत्तर प्रदेशात लव्ह जिहादमध्ये दोषी ठरणाऱ्यांना जन्मठेपची शिक्षा….

Love Jihad Law : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आज धर्मांतर विरोधी कायद्यात महत्त्वाची सुधारणी केली. या कायद्यात सुधारणा करून फसवणुकीने किंवा बळजबरीने कुणाचे धर्मांतर केले गेले तर त्याविरोधात शिक्षेची तरतूद आणखी कडक करण्यात आली आहे.

लव्ह जिहादचे आमिष दाखवून महिलेचा छळ करणाऱ्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. अवैध धर्मांतराच्या गंभीर घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कायद्याची व्याप्ती आणि शिक्षेचा कालावधी वाढविला आहे.


आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये कमाल १० वर्षांपर्यंत शिक्षा आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद होती. धर्मांतरासाठी परकीय निधी दिल्यास आता ७ ते १४ वर्षांचा तुरुंगवास आणि किमान १० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. उत्तर प्रदेश विधानसभेत बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर प्रतिबंध विधेयक-२०२४ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सादर करण्यात आले. Love Jihad Law
त्या अंतर्गत आता, जर कोणी धार्मिक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवितासाठी किंवा मालमत्तेसाठी धमकावत असेल किंवा हल्ला केला असेल, लग्न करण्याचे वचन दिले असेल किंवा कट रचला असेल, किंवा अल्पवयीन, स्त्रीकिंवा कोणत्याही व्यक्तीची तस्करी केली असेल तर त्याचा गुन्हा दाखल केला जाईल.
२० वर्षापर्यंत शिक्षा होणार..
आरोपींना २० वर्षांपेक्षा कमी कारावास किंवा जन्मठेप आणि दंड अशी शिक्षा होईल. पीडितेच्या उपचार खर्च आणि पुनर्वसनासाठी न्यायालय दंड म्हणून रक्कम निश्चित करू शकेल. गंभीर गुन्ह्यांप्रमाणेच आता कोणत्याही व्यक्तीला धर्मांतराच्या प्रकरणातही एफआयआर दाखल करता येणार आहे. यापूर्वी, धर्मांतरामुळे बाधित व्यक्ती, त्याचे नातेवाईक किंवा जवळच्या नातेवाईकांच्या वतीने एफआयआर दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
