प्रेमाची नशा जीवावर बेतली! तब्बल 10 बिअर, 45 झोपेच्या गोळ्या; प्रसिद्ध डॉक्टरच टोकाचं पाऊल..

मुंबई : डोंबिवलीमधील एका नामांकीत रूग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टरने प्रेम संबंधातून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या डॉक्टरने 10 बिअर पिऊन आणि 45 झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, डोंबिवली मधील नामांकित डॉक्टरचे एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. संबंधित नर्स लग्नासाठी वारंवार तगादा लावत होती. त्यामुळे डॉक्टर मानसिक तणावात होता. यातूनच त्याने टोकाचा निर्णय घेत 10 बिअर पिऊन आणि 45 झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो वाचला असून विष्णूनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान या डॉक्टरची पत्नी देखील डॉक्टर आहे.या डॉक्टरचे रुग्णालयातील एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती आणि पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. या वादाला कंटाळून डॉक्टर एका सोसायटीत वेगळे राहू लागले. संबंधित नर्सने डॉक्टरकडे लग्नासाठी वारंवार तगादा लावला. मात्र लग्न झाले असताना तिच्याशी लग्न कसे करू? असे डॉक्टरांनी म्हटल्यानंतर नर्सने बोलणे बंद केले.

दरम्यान आपल्या प्रेयसीने बोलणे बंद केल्यामुळे व्यथित झालेल्या डॉक्टरने 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.