खरेदीदारांना लॉटरी!सोन्याच्या 10 तोळ्यामागे 29,400 रुपयांची घसरण, वाचा 22 अन् 24 कॅरेटचा भाव काय?


पुणे : गेल्या काही दिवसापासून इराण आणि इस्त्राईल युद्धामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र सोन्याचे दर आज पुन्हा एकदा घसरले आहेत. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 2940 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे खरेदीरांना मोठी लॉटरी लागली आहे.

सध्या लग्नसराईचा काळ असल्याने या काळात सोने खरेदीसाठी जास्त गर्दी होते. त्यामुळे तुम्हालाही सोनं खरेदी करायचे असेल तर ही सुवर्णसंधी आहे. सोन्याचे दर आज पुन्हा एकदा घसरले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 2940 रुपयांनी घसरले आहे. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आता, 24 कॅरेट सोन्याचे दर 10 तोळ्यामागे 29400 रुपयांनी घसरल आहेत. 10 तोळ्यासाठी तुम्हाला 14,03,500 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 तोळ्यामागे 2940 रुपयांची घसरण झाली आहे. हे दर 1,40,350 रुपये झाले आहे. 8 ग्रॅममागे 2352 रुपयांनी घसरण होऊन हे दर 1,12,280 रुपये झाले आहेत.आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 1,28,650 रुपयांवर आहेत. या दरात 2700 रुपयांची घसरण झाली आहे

सोन्याचे दर मागच्या दोन आठवड्यापासून सतत घसरताना दिसत आहे. मागच्या 24 दिवसात सोन्याचे दर 24000 पेक्षा जास्त रुपयांनी घसरले आहेत. कालच्या एका दिवसात सोन्याचे दर 10 हजारांनी घसरले होते. तर चांदी 22000 रुपयांनी घसरली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!