खरेदीदारांना लॉटरी! सोन्याच्या दरात तब्बल 13 हजार रुपयांची घसरण तर चांदीही स्वस्त.., किती आहे आजचा दर?

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दराचा चांगलाच भडका उडाला होता. त्यामुळे खरेरीदारांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच आता सोन्याच्या भावात तब्बल 13000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 32 हजार 700 रुपयांची घसरण झाली आहे.

जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम सोने चांदीच्या बाजारावर दिसून येत आहे. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 13.700 रुपयांनी उतरले आहेत, तर चांदीच्या दरात प्रति किलो 32,700रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
अवघ्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत 8.47 % आणि चांदीच्या किमतीत 12.40 % घट झाली आहे.24 कॅरेट सोन्याचा दर 1,70.,090 रुपये होता, जो आता घसरून 1,45,970 रुपयांवर आला आहे. तर महिन्याच्या सुरुवातीला चांदी 3,15,000 रुपयांच्या उच्चांकावर होती, ती आता 2,45,000 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

दरम्यान अमेरिकेत व्याजदर प्रदीर्घ काळ चढे राहण्याची शक्यता आहे. जेव्हा व्याजदर जास्त असतात, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात, ज्यामुळे सोन्याची मागणी कमी होत आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या घरात पुन्हा एकदा घसरन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.