टोमॅटोच्या दराला लागली नजर! आता किमतीत झाली मोठी घसरण, दर निम्म्याहून खाली..


पुणे : राज्यात सर्वत्र टोमॅटोच्या दरांनी उच्चांकी गाठलीये. टोमॅटोचे दर वाढल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. गेल्या २ महिन्यांपासून वाढत असलेल्या दरांनंतर आता ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात दर कमी होऊ लागले आहेत. १२५ ते २०० रुपयांवर गेलेले घाऊक बाजारातील दर आता ७० ते ८५ रुपयांवर आले आहेत.

राज्यात जून, जुलै महिन्यांत प्रामुख्याने नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक होत होती. आता नाशिक, पुणे, मुंबई बाजार समितीत आवक वाढली आहे. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत, कर्नाटकातील बेंगळुरू बाजार समितीत टोमॅटोची आवक नव्याने सुरू झाली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात घसरण सुरू झाली आहे.

अचानक टोमॅटोचे भाव निम्म्याने कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नव्याने लागवड केलेला टोमॅटो मार्केटमध्ये आल्याने क्रेट मागे ५० टक्के घट झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो ५० ते ८५ रुपये प्रतिकिलो बाजरभावाने विकला जात आहे.

रविवारी राज्यातील आवक आणि दर

रविवारी कोल्हापुरात ३८५ क्विंटल आवक झाली, सरासरी ४३०० रुपये दर मिळाला. नागपुरात ७०० क्विंटल आवक झाली, सरासरी ३६२५ रुपये दर मिळाला. औरंगाबादमध्ये ९३ क्विंटल आवक झाली, सरासरी ४७५० रुपये दर मिळाला. पनवेलमध्ये ४४५ क्विंटल आवक झाली, सरासरी दर ५५०० मिळाला. राज्यभरात आवक वाढून सरासरी दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यभरातून आवक वाढली

नारायणगाव बाजार समितीत आवक वाढली नाही, पण दर पन्नास टक्क्यांनी घटले आहेत. राज्यातील अन्य बाजार समितीत आवक वाढली आहे. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो खरेदी-विक्री सुरू झाली आहे. सरासरी पन्नास टक्क्यांनी दरात घट झाली आहे. ऑगस्टअखेर आवक आणखी वाढून दरात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!