भरदिवसा घरफोडया करणाऱ्या चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त


लोणी काळभोर : भरदिवसा घरफोडया करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जलसिंग रजपुतसिंग दुधानी, (वय ३० वर्षे, रा. सर्वे नं ११०, अंध शाळेच्या पाठीमागे, रामटेकडी हडपसर पुणे) , हुकुमसिंग रामसिंग कल्याणी, (वय ३२ वर्षे, रा. रामटेकडी बस स्टॉपशेजारी, कोठारी मारूती कार शोरूम जवळ, रामटेकडी, हडपसर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावी आहेत.

याप्रकरणी मंदार सुभाष धुमाळ (रा. धुमाळमळा, श्रीनाथ मस्कोबा मंदिराच्या मागे, थेऊरफाटा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मंगळवारी (ता.१६ )दुपारच्या दरम्यान फिर्यादी धुमाळ यांचे घर बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने भर दुपारच्या वेळेत घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूमधील लोखंडी कपाट तोडून लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ९० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करून नेल्याची फिर्याद दिली.

त्यानुसार घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रिक विष्लेशन करून आरोपींचे शोध घेण्याचे काम पोलसांनी सुरू केले. पोलिसांना माहिती मिळाली पुणे सोलापूर रोडवर कवडीपाट टोलनाका येथे दिवसा घरफोडी करणारे दोन इसम तोंडाला रूमाल बांधून पल्सर दुचाकीवरून फिरत आहेत. गाडीवरील पाठीमागे बसलेल्या इसमाचे पाठीवर काळया रंगाची बॅग आहे.

मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच अधिक माहिती घेतली असता ते पोलीस अभिलेखावरील घरफोडया करणारे सराईत गुन्हेगार असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता दोन्ही आरोपीतांचे कमरेला लावलेले दोन लोखंडी चाकु मिळूल आले तसेच त्यातील एका आरोपीचे पाठीवरील काळया बॅगमध्ये २ लोखंडी कटावणी, एक लोखंडी चिमटा, तसेच त्यांचे ताब्यातील काळे रंगाची पल्सर दुचाकी गाडी असा मुद्देमाल जप्त केला.

तसेच सदर गाडीबाबत त्यांची अधिक चौकशी केली असता सदरची गाडी शिवाजीनगर परिसरामधून चोरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची पोलिसांनी कसून चैकशी असता त्यांनी खालील गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडून वेगवेगळया गुन्हयांमध्ये चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले. त्यांच्याकडून एकूण ३ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, सह पोलीस आयुक्तसंदिप कर्णिक,अपरी पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख व मा सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग. पुणे शहर अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरिक्षक. सुभाष काळे व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षकअमित गोरे, पोलीस हवालदार सतिष सायकर, पोलीस हवालदार सुदर्शन बोरावके, पो.ना. सुनिल नागलोत, पो.ना. श्रीनाथ जाधव, पो.शि. दिपक सोनवणे, पो.शि. शैलेश कुदळे, पो.शि. बाजीराव वीर, पो.शि. चक्रधर शिरगिरे, मपोशि. विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!