Loni Kalbhor News : हेडफोनने केला घात! तरुणाला भरधाव वंदे भारत ट्रेनने चिरडले, लोणी काळभोर येथील धक्कादायक घटना…


Loni Kalbhor News लोणी काळभोर : रेल्वे स्थानकात एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पुलाचा वापर करा, रेल्वे रूळ ओलांडू नका अशा सूचना रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वारंवार देण्यात येतात, मात्र त्याचे गांभीर्य लक्षात न घेता प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळते.

रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांमध्ये प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. असाच एक धक्कादायक प्रकार विरार रेल्वे स्थानकात येथे समोर आला आहे .कानात हेडफोन लावून रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या एका तरुणाला वंदे भारत एक्स्प्रेसने चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही लोणी स्टेशन (ता.हवेली) येथे गुरुवारी (ता.०७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोलापूरच्या दिशेकडे भरधाव वेगाने चाललेल्या वंदे भारत एक्स्प्रेस ने तरुणाला चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्यामाहिती नुसार, मुंबईहून सोलापूर व सोलापूरहून पुन्हा मुंबईच्या दिशेने वंदे भारत एक्स्प्रेस ही दैनंदिन प्रवासी फेऱ्या मारते. नेहमीप्रमाणे वंदे भारत एक्स्प्रेस गुरुवारी सोलापूरच्या दिशेने निघाली होती. Loni Kalbhor News

यावेळी लोणी स्टेशन येथे कानात हेडफोन घालून एक तरुण गाणी ऐकत रेल्वे लाईन क्रॉस करत होता. कानात हेडफोन असल्याने तरुणाला गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला नसल्याने भरधाव वेगाने चाललेल्या वंदे भारत एक्स्प्रेसने तरुणाला चिरडले. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!