Loni Kalbhor News : कोलवडीत जबर चोरी, १० लाखांचे सोनं चोरट्यांनी केले लंपास…


Loni Kalbhor News : घराचा दरवाजा उघडा राहिल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी साडेसोळा तोळे वजनाचे सुमारे १० लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांची लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

कोलवडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड वस्ती परिसरात ही घटना शुक्रवारी (ता.२२) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद किसन गायकवाड (वय-४८, रा. कोलवडी ता. हवेली, जि. पुणे) यांनी याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, प्रमोद गायकवाड हे कोलवडी ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड वस्ती परिसरात राहतात. गुरुवारी (ता.२१) रात्री दरवाजा बंद करायचा मुली विसरून गेल्या. त्यामुळे त्यांचा दरवाजा रात्रभर उघडा राहिला.

त्यांच्या घरातील एक व्यक्ती पहाटे पाच वाजता व्यायामासाठी बाहेर चालला होता. तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, कपाट उघडे असल्याचे दिसून आले. कपाटातील दागिने तपासले असता, त्यांना कपाटात साडेसोळा तोळे दागिने मिळून आले नाहीत. Loni Kalbhor News

प्रमोद गायकवाड यांना आपल्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तत्काळ लोणीकंद पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!