loni Kalbhor News : जप्त वाहन विक्री प्रकरणी लोणी काळभोरच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन, पोलिसांचीच चोरी उघड झाल्याने उडाली खळबळ…


loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जप्त मुद्देमाल वाहन विक्री प्रकरणी प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे उघड आल्याने याप्रकणी ही कारवाई करण्यात आली आहे.

आपल्याच पोलिस ठाण्यात पोलिसानींच दरोडा होय, शब्दशः दरोडाच टाकल्याचा धक्कादायक प्रकार शहर पोलिस दलाअंतर्गत असलेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. आता याप्रकरणी ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी काढली. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल यात पोलिसांनी बाळासाहेब घाडगे उर्फ बाळू (झिरो पोलीस) या आरोपीला अटक केली होती. loni Kalbhor News

या आरोपीकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, अशी कबुली दिली. तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस करणाऱ्याने या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले.

दरम्यान, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी उपस्थिती लावली नाही. परिणामी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!