Loni Kalbhor : अजून एक महाकाय होर्डिंग कोसळले, लोणी काळभोर मधील गुलमोहर लॉन्स येथील घटना, दोघे जखमी, अनेक गाड्यांचे नुकसान…


Loni Kalbhor : मुंबई येथे बेकायदा होर्डिंग पडल्याने जीवितहानीची दुर्घटना घडल्याची घटना ताजी असतानाच पुणे-सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.

ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी (ता.१८) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. तर एका घोड्याला किरकोळ मार लागला आहे. मात्र, या घटनेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भरत साबळे (वय ५७, रा. येरवडा, पुणे), अक्षय कोरवी (वय. २७, रा. पुणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

सविस्तर माहिती अशी की, गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी एक सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी पुण्यातील एका बँड बाजा पथकाला सुपारी देण्यात आली होती. या सोहळ्यासाठी पथक गुलमोहर लॉन्स येथे वाजविण्यासाठी आले होते. Loni Kalbhor

यावेळी गुलमोहरच्या समोरील अंगणात वाजंत्री बसले होते. तेथेच एका झाडाखाली घोडा गाडी बांधण्यात आली होती. येथील ओढ्यालगत एक धोकादायकरीत्या एक होर्डिंग बांधण्यात आलेले आहे.

दरम्यान, शनिवारी दुपारी सव्वा चार वाजण्याचा सुमारास अवकाळी पाऊस व वादळी वारा सुरु झाला. या पावसात हे धोकादायकरीत्या बांधण्यात आलेले महाकाय होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली भरत साबळे व अक्षय कोरवी हे दोघे सापडले.

तेव्हा या दोघांना नागरिकांनी तातडीने बाहेर काढले व उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तर या दुर्घटनेत घोडाही किरकोळ जखमी झाला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गोपनीय हवालदार रामदास मेमाणे, अंमलदार अजिंक्य जोजारे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!