Loni Kalbhor : लोणी स्टेशन येथील हाणामारी प्रकरण! सोरतापवाडी व पेठ येथील सहा जणांवर गुन्हा दाखल..
Loni Kalbhor लोणी काळभोर : किरकोळ कारणावरून तिघांना एका टोळक्याने शिवीगाळ करून हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना लोणी स्टेशन चौकशेजारी मंगळवारी (ता.२१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय भरत शिंदे,अमित बाळू साबळे व गजनन भीमराव शिराळे (रा. तिघेही पाण्याच्या टाकीजवळ, समतानगर ,लोणी स्टेशन कदमवस्ती ,ता. हवेली) अशी मारहाण झालेल्या तिघांची नावे आहेत. तर स्वप्नील चौधरी, यश चौधरी,दादा चौधरी,(रा.सर्व पेठ गाव,ता हवेली ) उत्कृष्ट बाबर ( रा.सोरतापवाडी ता. हवेली) शिवम शिवकर (रा.आळंदि म्हातोबाची ता.हवेली) अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावी असून घटना घडल्या पासून आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी अजय भारत शिंद ,(वय २४ रा, पाण्याच्या टाकीजवळ ,समतानगर ,लोणी स्टेशन.कदमवस्ती ता. हवेली) यानो लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (ता २१) सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन चौकीतील हॉटेल आशीर्वाद शेजारी वरील सहा जणांनी अजय व दोन मित्र याना आमच्यकडे काय बघतो, लई मस्ती आली का? असे म्हणून शिवीगाळ करून हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण करून ,जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वप्नील चौधरी याने तिघांना मारहाण केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.