Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये बोगस पत्रकारांचा सुळसुळाट, चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून ठेकेदाराकडून काढले हजारो रुपये…


Loni Kalbhor लोणी काळभोर :  लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी
पोलिसांकडून होणाऱ्या त्रासापासून वाचविण्यासाठी खोटी बतावणी करून दोन कथित पत्रकारांनी एका ठेकेदाराकडून २ लाखांची खंडणी मागत ३० हजार रुपये उकळले आहेत.

याबाबत याठिकाणी तपास सुरू आहे. याठिकाणी बोगस पत्रकारांच्या ब्लॅकमेलिंगमुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. याबाबत तक्रारी देखील आल्या आहेत. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. याठिकाणी अनेक पत्रकार आहेत.

यामधील एक कथित पत्रकार हा भारतातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनेचा तालुकाध्यक्ष, तर दुसरा हा त्याच संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. मागील आठ दिवसांपूर्वी एका दोन वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली होती.

नंतर ठेकेदारावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीचा मृत्यू झाला होता. नंतर ठेकेदाराने चिमुकल्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली व चिमुकल्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गावी पाठविण्याची व्यवस्था केली.

यावेळी मृत मुलीच्या आईवडिलांनी ठेकेदाराच्या विरोधात कोणतीही तक्रार दिली नाही. यानंतर या दोन पत्रकारांनी ठेकेदाराला गाठले. तसेच तुम्हाला या गुन्ह्यातून व पोलिसांच्या त्रासापासून वाचवितो, असे सांगितले.
त्यांच्याकडे २ लाख रुपये मागितले. Loni Kalabhor

दरम्यान, या प्रकरणात माझी काहीही चूक नाही. पालकांची चूक असल्याचे ठेकेदार म्हणाला. त्यांनी तसं मान्य देखील केलं असल्याचे ते म्हणाले. मात्र पत्रकारांनी ठेकेदाराला धमकी दिली. भीतीपोटी ठेकेदारांने बोगस पत्रकारांना ४० हजार रुपये देतो, असे सांगितले.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याचे त्या पत्रकारांना माहिती देखील नाही. तरीही त्यांनी ठेकेदाराला उर्वरित १० हजार रुपयांच्या पैशाची मागणी केली.
या परिसरात सध्या तोतया पत्रकार अवैध धंद्यांची बातमी करतो, अशी धमकी देऊन पैसे उकळल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत.

या ठिकाणी बोगस पत्रकारांनी उच्छाद मांडला आहे. ते तक्रार देतात आणि मिटविण्यासाठी हजारो रुपये उकळतात. या कथित पत्रकाराच्या विरोधात फिर्याद देण्यास कोणी पुढे येत नाही. यामुळे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!