‘अजितदादा अमर रहें’! गंगामातेच्या पावन जलात अजितदादांना अखेरचा निरोप, उपस्थितांना अश्रू अनावर..


हरिद्वार : महाराष्ट्राचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष व जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे विसर्जन आज उत्तर भारतातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या गंगामातेच्या पावनजलात करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्वांनी दादांच्या पुण्यात्म्याच्या शांतीसाठी सामूहिक मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थीचे हरिद्वार येथील व्हीआयपी घाटावर विसर्जन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा अस्थी घेऊन हरिद्वारला पोहोचले होते.त्यांनीच वैदिक विधीनुसार विसर्जन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते तर पवार कुटुंबातील कोणताही सदस्य कार्यक्रमात सहभागी नव्हता.

हरिद्वारच्या पवित्र भूमीवर पार पडलेल्या या अस्थीविसर्जन सोहळ्याने अजित पवार यांच्या जीवनप्रवास संपला असला, तरी त्यांच्या कार्याचा वारसा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सदैव जिवंत राहील, अशी भावना उपस्थित प्रत्येकाच्या मनात ठळकपणे दिसून येत होती.

गंगामातेच्या पावन जलात दादांच्या अस्थींचे विसर्जन करताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात अपार आदरभाव दिसून येत होता.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विविध राज्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, संतगण तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!