अजित पवार अमर रहे! दादा परत या.., अश्रुंचा बांध फुटला, बारामतीमध्ये जनसागर उसळला

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला आहे.बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांचं पार्थिव ठेवण्यात आल आहे.’ अजित पवार अमर रहे… दादा परत या, परत या.. असा टाहो कार्यकर्त्यांनी फोडला आहे.

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निरोपासाठी जनसागर उसळला असून, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उभे असलेले नागरिक आणि कार्यकर्ते “अजित दादा परत या” अशा घोषणा देत होते. पुष्पवृष्टी करत, जड अंतःकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर अंत्यसंस्काराला उपस्थित आहेत. अजित पवार यांच्या अकालीन निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळला आहे..

गेल्या वर्षी विधानसभा निवडणूकीत लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली. ही योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणली. आपल्या लाडक्या दादाला निरोप देताना लाडक्या बहिणीने टाहो फोडला. बारामतीच्या मैदानात महिला लाडके दादा सोडून गेल्याने आक्रोश करू लागल्या. त्याच्या निधनाने महाराष्ट्र सुन्न झाला आहे.