लोणावळा हादरलं ; 23 वर्षीय तरुणीला कारमध्ये जबरदस्तीनं खेचलं, तीन नराधमांकडून रात्रभर अत्याचार


लोणावळा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अत्याचाराच्या घटना समोर येत असताना जाता लोणावळा शहरात मानवतेला कळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. लोणावळ्यातील स्थानिक 23 वर्षीय तरुणी शुक्रवारी रात्री 9 वाजता रस्त्याने घरी जात असताना तीन अज्ञात नराधमांनी त्यांच्या कारमध्ये ओढून तिला बसवले. कार एका निर्जनस्थळी नेऊन तिन्ही नराधमांनी तरुणीवर शनिवारी पहाटेपर्यंत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लोणावळा शहर व परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी तीन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरातील एका 23 वर्षीय पीडित तरुणीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित तरुणी ही शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास लोणावळ्यातील तुंगार्ली गावच्या हद्दीतील एका रस्त्याने जात असताना कारमधून आलेल्या तीन तरुणांनी तिचे तोंड दाबून जबरदस्तीने कारमध्ये ओढून बसवले. तिला विवस्त्र करून हाताने मारहाण करत चालत्या कारमध्ये तिच्यावर अत्याचार केला.त्यानंतर नराधमांनी तिला घटनास्थळावरून कारमध्ये घेऊन येत लोणावळ्यातील नांगरगाव येथील रस्त्याच्या कडेला टाकून देत फरार झाले आहे.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत.

दरम्यान पीडीत तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरुन तसेच घटनास्थळ व परिसरातील रस्त्यांवरील काही तांत्रिक बाबींची पाहणी केली आणि अवघ्या 12 तासांच्या आत याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!