Loksabha Election : धाराशिवमधून कोणत्याही शिवसैनिकाला उमेदवारी द्या, अन्यथा क्रांती करू! शिंदे गटाचा बडा नेता उतरला मैदानात…


Loksabha Election : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभेच्या जागेवरून शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक झाला आहे. याठिकाणी अजित पवार यांच्या गटाला ही जागा देण्यात आली आहे. यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

धारशिवची जागा ही पारंपरिक शिवसेनेची आहे. त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाला या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी बार्शीचे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकरांनी केली आहे. यामुळे याठिकाणी महायुती आपला उमेदवार बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत आंधळकर म्हणाले की, शिवसेनेकडून धनाजी सावंत यांना किंवा मला उमेदवारी द्यावी. भाऊसाहेब आंधळकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. यामुळे आता ते वेगळी वाट धरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावेळी आंधळकर म्हणाले की, ही राजकीय भेट नाही. मी आंबेडकरांकडे वेगळ्या कामासाठी आलो होतो. आंधळकर धाराशिवमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचेही बोलले जात आहे. Loksabha Election

यामुळे येणाऱ्या काळात याठिकाणी अनेक घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असे आंधळकर म्हणाले, यामुळे आता वरिष्ठ नेते नेमकं कोणती भूमिका घेणार हे लवकरच समजेल

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!