Loksabha Election 2024 : मतदानानंतर चिठ्ठी न पडल्यास करायचे काय? हरकत घेता येणार? जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय…

Loksabha Election 2024 : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मतदानानंतर व्हीव्हीपॅट मशिनमध्ये दिसणार्या चिठ्ठीबाबत व्हॉट्सअॅपवरून एक चित्रफीत व त्यासोबत संदेश प्रसारित होत आहे.
त्यानुषंगाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रसारित होत असलेला संदेश हा मतदानाच्या दिवशी, मतदान करताना मतदाराने ज्या पक्षाला मतदान केले आहे, त्या पक्षाची चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये खाली पडताना न दिसल्यास हरकत घेण्याबाबतच्या आशयाचा आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
यामुळे याची बरीच चर्चा रंगली आहे. मतदाराने केलेले मतदान हे इतर उमेदवाराला दर्शवीत असल्याबाबत अभिकथन केले असल्यास सदर मतदाराला निवडणूक संचालन नियम १९६१ च्या नियम ४९ एमए अन्वये चाचणी मतदान करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावयाची तरतूद आहे. Loksabha Election 2024
यामुळे याबाबत विचारणा केली जात होती. या प्रतिज्ञापत्रकात मतदाराने केलेले अभिकथन चुकीचे आढळल्यास भारतीय दंडसहिता कलम १७७ अन्वये दंडात्मक तरतूद आहे.