Loksabha Election 2024 : काँग्रेस कार्यालयाबाहेर राडा! अनेक वाहनांची तोडफोड, भाजपवर गंभीर आरोप, नेमकं घडलं काय?


Loksabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. असे असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथील गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

या हल्ल्याबाबत काँग्रेस पक्षाने निवेदन जारी केले आहे. याबाबत भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये ‘स्मृती इराणी आणि भाजपचे कार्यकर्ते यूपीच्या अमेठीमध्ये चांगलेच घाबरले आहेत. समोरच्या पराभवाने हताश झालेले भाजपचे गुंड लाठ्या घेऊन अमेठीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पोहोचले. Loksabha Election 2024

तेथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. अमेठीतील काँग्रेस कार्यकर्त्यांवर आणि जनतेवरही प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

या घटनेदरम्यान स्थानिक लोकांच्या वाहनांचेही नुकसान झाले. अमेठीमध्ये भाजपचा पराभव होणार आहे याची ही घटना साक्षीदार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!