Loksabha Election 2024 : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचे शिलेदार ठरले, १७ उमेदवारांची यादी आली समोर, जाणून घ्या कोण कुठे लढणार…

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, अद्याप सर्वच पक्षांकडून उमेवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा पेच अजून सुटलेला नाही.

पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली असून त्यात १७ नावांना मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. Loksabha Election 2024
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संभाव्य यादी…
विनोद घोसाळकर- उत्तर मुंबई
संजयदिना पाटील- मुंबई ईशान्य
अरविंद सावंत- दक्षिण मुंबई
अनिल देसाई- दक्षिण मध्य मुंबई
चंद्रकांत खैरे- छत्रपती संभाजी नगर
नरेंद्र खेडकर- बुलढाणा

संजय देशमुख- यवतमाळ
ओमराज निंबाळकर- उस्मानाबाद
बंडू जाधव- परभणी
वाघचौरे-सिर्डी
विजय करंजकर- नाशिक
राजन विचारे-ठाणे
अनंत गिते- रायगड
नागेश आष्टीकर- हिंगोली
विनायक राऊत- रत्नागिरी-सिंधुदुर्ग
चंद्रहास पाटील- सांगली
संजोग वाघेरे- मावळ