Loksabha Election 2024 : शिरूरमध्ये आज महाप्रवेश!! शिंदेंचा शिलेदार अजित पवार गटात करणार प्रवेश…
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे शिल्लेदार माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या उपस्थित आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.
आपण शिरुर लोकसभा लढणार, हे याआधीच महायुतीत ठरलं होतं. असं आढळराव पाटील म्हणाले. शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागले आहे.
जरी आढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असला तरी आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर होणार का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं की, यापूर्वीच महायुतीत ठरलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिरुर लोकसभा निवडणूक लढणार. निवडणूक ही घड्याळ चिन्हावर लढणार असल्याने पक्षप्रवेश करत आहे. २०२१९ आणि आता २०२४ ला अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशीच लढत असली आता दोन्ही बाजू बदलल्या आहेत. Loksabha Election 2024
महायुतीत शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी असल्याने विजय सोपा आहे. २०१९ चा पराभव विसरलो. पराभवानंतर जनतेत मिसळुन कामे केली. पराभवानंतर पुन्हा लोकसभा लढणार हे मनातही नव्हते. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकसभा लढवण्यासाठीची संधी चालून आली, असे आढळराव पाटलांनी म्हंटले आहे.