Lok Saha Elections Result 2024 : सरकार येणार कोणाचं? नीतीश कुमार-चंद्राबाबू करणार गेम? नेमकी बेरीज कशी, जाणून घ्या…


Lok Saha Elections Result 2024 : लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा फटका बसला. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या ६० पेक्षा जास्त जागा देशभरात कमी झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा धडाकाच लावला होता.

एनडीए ४०० पर्यंत जाईल असा दावा अमित शाह यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात एनडीएचे ३०० उमेदवारही निवडून आले नाहीत. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू झाल्या आहेत.

एकूण निकाल पाहता सध्या तरी भाजपकडे २९२ उमेदवार आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. मात्र यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नीतीश कुमार यांनी आपली भूमिका बदलून जर इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर ते सत्तास्थापनेचा दावा करू शकतात. त्यामुळे भाजपचंही टेन्शन वाढलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एनडीएच्या मित्रपक्षांशी चर्चा केली आहे. त्यांना विश्वासात घेतले आहे. दुसरीकडे, भारतीय आघाडी सावधपणे पावले उचलत असून सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील.

दोन्ही पक्षांसाठी बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा करणार की नाही हे आज ठरेल अशी शक्यता आहे. Lok Saha Elections Result 2024

भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एनडीएच्या सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. बुधवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत याची औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू दिल्लीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करताना तसे संकेत दिले आहेत.

आता इंडिया आघाडी सत्ता स्थापन करण्यासाठी कशा प्रकारे पावलं उचलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यात कसलीही अडचण नाही, मात्र मित्रपक्ष सरकार स्थापनेसाठी दबाव आणत आहेत.

शरद पवार आणि ममता बॅनर्जी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे निश्चित झाले आहे. दुसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि डीके शिवकुमार आणि अन्य नेते चंद्राबाबूंच्या संपर्कात आहेत. या नेत्यांमधील संबंध चांगले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आजच्या बैठकीत नेमकी कशी सूत्र हलतात त्याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजचा दिवस मोठा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!