Lok Sabha Election Result Live Updates : चौथ्या फेरीत बारामतीतून अखेर सुप्रिया सुळे 19000 मतांनी आघाडीवर…

Lok Sabha Election Result Live Updates : देशातील नव्हे, तर राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये कोण विजयी होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बारामतीतून सुप्रिया सुळे चौथ्या फेरी अखेर तब्बल 19 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर, सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात 14 लाख 11 हजार 621 मतदारांनी मतदान केले असून त्यांची मतमोजणी सुरू आहे बारामती 59.50% मतदान झालं होतं एकूण मतदार हे 23 लाख 72 हजार 668 मतदार होते. Lok Sabha Election Result Live Updates

त्यापैकी आता मतमोजणी मध्ये पहिल्या फेरीमध्ये सुप्रिया सुळे या सात हजार मतांच्या आसपास आघाडीवर होत्या दुसऱ्या फेरीत ही आघाडी वाढली ती 11,341 मतांवर गेली तर तिसऱ्या फेरीमध्ये ही आघाडी 14 हजार मतांवर गेली, ती आघाडी चौथ्या फेरीत 19 हजारावर पोचली.