Lok Sabha Election Result 2024 : देशातील पहिला निकाल समोर, सेक्स व्हिडीओ प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा पराभूत…

Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकच्या निवडणुकीत आणि महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात चर्चेचा मुद्दा ठरलेल्या एनडीए आघाडीचे उमेदवार आणि अटकेत असेलला आरोपी प्रज्वल रेवण्णाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.
४०० महिलांचे लैंगिक शोषण, २८०० व्हिडिओ एवढी मोठी कर्तबगारी असलेला माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा नातू आणि भाजपचा उमेदवार प्रज्वल रेवंडा हा पराभूत झाला आहे. योगायोगाने देशातील पहिला निकाल जाहीर झाला तो प्रज्वलचा झाला आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रज्वल रेवण्णाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. भाजप नेत्यांनाही या मुद्द्यावरुन प्रचाराला सामोरे जाताना अडचण आल्याचं दिसून आलं. कर्नाटकसह देशभरात प्रज्ज्वल रेवण्णाच्या मुद्द्यावरुन रणकंदन घडलं होतं. आता, निवडणूक निकालात जनतेनं नाकारल्याचं दिसून येत आहे. Lok Sabha Election Result 2024
त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत भाजप प्रणित एनडीए २९० जागांवर, तर काँग्रेस प्रणित इंडिया महाआघाडी २३५ जागांवर पुढे आहे.
कर्नाटक मधील हसन या लोकसभा मतदारसंघाचा देशातील पहिला निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असून प्रज्वल रेवण्णाचा पराभव झाला आहे.