Lok Sabha Election Result 2024 : मुनगंटीवार, अजितदादा दोघांचा पराभव, ‘ते’ वाक्य होतंय व्हायरल, नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election Result 2024 : पुणे जिल्ह्यातील नवीन तर देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात दुरंगी लढत झाली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे एक लाखावरुन अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.

अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आहेत. महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष केवळ एका जागेवरच विजय मिळणार आहे. सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य जसे वाढत जाईल तसे कार्यकर्ते उत्साहात नाचत होते, याच दरम्यान एक आठवण मात्र ताजी झाली.
भाजप सत्तेत असताना विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सुधीर मुनगंटीवार भाषण करत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदार त्यांच्या भाषणात व्यत्यय आणू लागले, तेव्हा मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना आव्हान दिले की, माझ्या भाषणाच्या मध्ये मध्ये बोलू नका. Lok Sabha Election Result 2024

माझ्यामध्ये व्यत्यय आणू नका. हे बघा, जो माझ्यामध्ये बोलतो त्याचा पराभव होतो. मुनगंटीवार एवढे बोलल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार काही क्षण थांबले आणि अजित दादांनी उठून मुनगंटीवार यांनाच आव्हान दिले.
अजितदादांनी मुनगंटीवाराकडे इशारा करत विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या, पण चला.. मी मध्ये बोलतो. दाखवा माझा पराभव करून, असे आव्हानच दिले. हा प्रसंग तसा राजकीय दृष्ट्या वैचारिकच! अगदी गमतीजमतीचा भाग म्हणा! पण या लोकसभेच्या निवडणुकीत हे म्हणणे अगदी तंतोतंत खरे ठरले.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आणि तिकडे भाजपने जबरदस्तीने उभा केलेल्या सुधीर मनगुंटीवार यांचा देखील पराभव झाला. लोकसभा मतदानाच्या निकालानंतर या किश्शाची अनेकांना आठवण झाली.