Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आले? राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याने सगळं खरं खरं सांगितलं….

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, मराठा आरक्षण तसेच उत्तर महाराष्ट्रातील कांद्याचा प्रश्न आणि विरोधकांकडून तयार करण्यात आलेले नॅरेटिव्ह रोखण्यात अपयश आल्याने राज्यात भाजपला अपयश मिळाल्याची कबुली राज्यातील एका बड्या नेत्याने दिली आहे.

तसेच विधानसभेला भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. २३ पैकी फक्त नऊ जागा भाजपला वाचवता आल्या आहेत.
राज्यातील भाजपचा चेहरा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अपयशामुळे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपला निवडणुकांमध्ये हवं तसं मिळालेले नाही. याला अनेक कारणे आहेत. Lok Sabha Election Result 2024

लोकसभा निवडणुकीत विदर्भातील शेतकऱ्यांचा धानाचा मुद्दा, उत्तर महाराष्ट्रातील कांद्याचा मुद्दा, मराठवाड्यातील मराठा आरक्षण तसेच उमेदवारांची उशीरा झालेली निवड, उशिराने जाहीर केलेली उमेदवारी याचा फटका बसल्याची कबुली भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. सोशल मीडियात देखील विरोधकांकडून तयार करण्यात आलेले नरेटिव्ह थांबवण्यात भाजपला अपयश आल्याची कबुली दिली आहे.