Lok Sabha Election : पुण्यात विजयापूर्वीच लागला निकाल? राजकीय सेलिब्रेशन सुरु, नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. चौथ्या टप्प्यांचं मतदान उद्या पार पडले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडलं असून 4 जून रोजी त्याचा निकाल लागेल.
पण त्याच आधी पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेगकर यांनी आपण पन्नास हजारांच्या आसपासच्या मताधिक्यानी निवडून येईन असा दावा केला आहे. त्याचबरोबर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरुडमधून आपल्याला सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा दावा केला आहे. Lok Sabha Election
तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील मुरलीधर मोहळांच्या विजयाचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावण्यात आलेत. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचे भावी खासदार या आशयाचे बॅनर्स पुण्यात झळकताना दिसत आहेत. त्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच सेलिब्रेशन सुरू केल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पुणे लोकसभेसाठी यंदा तिरंगी लढत असून वसंत मोरे हे वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पण मुख्य लढत ही काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यामध्येच असल्याचे सांगितले जात आहे.