Lok Sabha Election : भाजप लागली कामाला! आता लोकसभेसाठी घोषवाक्यही ठरलं, अबकी बार….

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने बाकी आहेत. त्यामुळे देशभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी याबाबतीत आघाडीवर आहे
भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवे घोषवाक्य तयार केले आहे. या निवडणुकीत भाजप ‘तिसरी बार मोदी सरकार’, अबकी बार ४०० पार’, असा नारा देणार आहे. (ता.२) दिल्लीत भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत याबाबत घोषणा करण्यात आली.
भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘अबकी बार ४०० पार, तीसरी बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. आगामी निवडणुकीच्या काळात टीव्हीवर, रेडिओवर, सोशल मीडियावर, भाषणं आणि प्रचारसभांमध्ये हेच घोषवाक्य सतत आपल्या ऐकायला मिळणार आहे. Lok Sabha Election
भाजपने राज्य, लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील संयोजक आणि सहसंयोजकही निश्चित केले आहे. या निवडणुकीत भाजप महिला मतदार आणि तरुणांवर भर देणार आहे. प्रथमच मतदानासाठी जाणाऱ्या अशा मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. भाजप सोशल मीडियावरील प्रचारालाही गती देणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच संपूर्ण भारताचा दौरा करणार आहेत. यासोबतच गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हेही वेगवेगळ्या वेळी देशाच्या विविध भागांना भेटी देणार आहेत. २२ जानेवारीनंतरही पंतप्रधानांचा हा दौरा सुरू होणार आहे.