Lok Sabha Election : मोठी बातमी! लोकसभेच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार, महत्वाची माहिती आली समोर…


Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

यंदाची निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून पुणे लोकसभेकडे राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. राजकीय पक्षामध्ये जागावाटपासाठी बैठका सुरु आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा केव्हा जाहीर करणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत.

अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तारीख १८ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी १५ मार्च रोजी निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

तसेच या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरली जाणार आहे. १८ मार्च रोजी आचारसंहिता लागू केली जाणार आहे, अशी देखील माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. Lok Sabha Election

केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये तीन आयुक्त असून यापैकी एक मुख्य आयुक्त आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी इतर दोन आयुक्त असतात. पण या पूर्वी एक आयुक्तपद रिक्त होतं तर आता अरूण कुमार यांच्या राजीनाम्यानंतर दुसरे पदही रिक्त आहे. येणाऱ्या बैठकीत ही दोन्ही पदं भरली जाणार आहे, त्यानंतर लोकसभेचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका पुढच्या आठवड्यात जाहीर होणार असून त्यासाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. येत्या एक दोन दिवसात त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!