Lok Sabha Election : खबरदार! दोन वेळा मतदान कराल तर अडकाल…निवडणूक आयोगाने दिला गंभीर इशारा, जाणून घ्या..

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुका होणार आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. याची घोषणा आज अखेर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.
देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. अशातच आता राजकीय पक्षांच्या बैठकांना देखील जास्त वेग येईल.
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे या तारखांना मतदान पार पडेल. दरम्यान, निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी राजीव कुमार यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
निवडणुकीदरम्यान दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई केली जाणार आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. तसेच मनी आणि मसल पॉवरला आगामी निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर आहे. Lok Sabha Election
दरम्यान, देशात ९७.८ कोटीपेक्षा जास्त मतदार असून यापैकी त्यामध्ये ९४.७ कोटी पुरुष आणि ४७. १ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे.१. ८२ कोटी नवीन मतदार आहेत. यावर्षी ८२ लाख प्रौढ मतदार मतदान करतील तर ४८ हजार तृतीयपंथीय मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.