Lok Sabha Election : ब्रेकिंग! शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दोघांना अनपेक्षितपणे उमेदवारी जाहीर….


Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे,

अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. Lok Sabha Election

तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

दरम्यान, नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमर काळे आणि निलेश लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. निलेश लंके यांना अहमदनगरमधून तर अमर काळे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

कोणाला कोठून उमेदवारी जाणून घ्या..

बारामती-सुप्रिया सुळे
शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके
वर्धा- अमर काळे
दिंडोरी- भास्करराव भगरे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!