Lok Sabha Election : प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला? खासदार साहेब उत्तर द्या, शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरोधात बॅनरबाजी…


Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचा प्रचारात रंगत आणली आहे. आता जवळपास सर्वच ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत.

उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे. परंतु प्रचार करताना वेगवेगळे अनुभव उमेदवारांना येत आहे. मतदार आता जागृत झाले असल्याचा हा परिणाम आहे. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात त्यांच्या मतदार संघात बॅनर झळकले आहेत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहे.

असे विचारले प्रश्न..

खासदार झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांचा मतदारांमध्ये पाहिजे तेवढा जनसंपर्क राहिलेला नाही. अमोल कोल्हे यांनी नुकताच आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात प्रचार दौरा केला. या वेळी परिसरात अमोल कोल्हे यांच्या विरोधात लागलेल्या पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बॅनरवर विद्यमान खासदार साहेब गेले पाच वर्ष तुम्ही कुठे होता? कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता पाच वर्ष मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला ? असे तीन नेमके आणि मुद्द्याचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातील आंबेगावमध्ये लागलेल्या या बॅनरची चर्चा सर्वत्र आहे. Lok Sabha Election

दरम्यान,गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिरूर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीत पुन्हा आमनेसामने आले आहेत.

दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात करून दिली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत, अशी नाराजी आता लोकसभा मतदारसंघात नागरिकांकडून दिसू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!