Lok Sabha Election : अभिनेत्री कंगना रानौतला लोकसभा निवडणुकीचे तिकीट जाहीर, ‘या’ मतदार संघातून भाजपकडून लढणार निवडणूक..

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे .
अशातच आता भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत एकूण १११ उमेदवारांची नावे आहेत. भाजपने हिमाचलमधील मंडीमधून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला तिकीट दिले आहे, तर अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठमधून उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
यावेळी पक्षाने पिलीभीतमधून विद्यमान खासदार वरुण गांधी यांचे तिकीट रद्द केले आहे. गाझियाबाद मतदारसंघातून भाजपने वरुण गांधी यांच्या जागी जितिन प्रसाद आणि विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री जनरल व्हीके सिंह यांच्या जागी अतुल गर्ग यांना तिकीट दिले आहे. खुद्द जनरल व्ही के सिंह यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. Lok Sabha Election
दरम्यान, भाजपच्या पाचव्या यादीत यूपीच्या १३ लोकसभेच्या जागांसह आंध्र प्रदेशच्या ६ जागा, बिहारच्या १७ जागा, गोव्याच्या १ जागा, गुजरातच्या ६ जागा, हरियाणाच्या ४ जागा, हिमाचल प्रदेशच्या २ जागा, झारखंडच्या 3 जागांचा समावेश आहे.
तर, कर्नाटक आणि केरळमधील प्रत्येकी ४ जागांवर, महाराष्ट्रातील ३ जागा, मिझोराममध्ये एक, ओडिशातील १८ जागा, राजस्थानमध्ये ७ जागा, सिक्कीममधील एक जागा, तेलंगणातील २ आणि पश्चिम बंगालमधील १९ जागांवर यादी जाहीर करण्यात आली आहे.