Lok Sabha Election : पत्र्याचे घर, शरद पवारांकडून लोकसभेची उमेदवारी अन् मेळाव्यात लोकांकडून १० लाखांची वर्गणी, साधा माणूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिक्षकाची राज्यात चर्चा…


Lok Sabha Election : सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणूक लढणं म्हणजे काय सोपं काम नसतं, यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात. काहीजण मात्र आपल्या नेत्यासाठी पैसे गोळा करून देतात. यामुळे असे उमेदवार नेहेमी लक्षात राहतात.

सध्या लोकसभेच्या निवडणुकीतही असेच घडले आहे. पिंपळगाव बसवंत मधील भास्कर भगरेंना दिंडोरीच्या लोकसभेसाठी शरद पवारांनी उमेदवारी काय दिली. लोकांनी गावातच वर्गणी गोळा केली. आतापर्यंत 10 लाख रुपये जमा झाले आहेत.

त्यांच्या समोरील उमेदवार हा केंद्रीय मंत्री आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांच्या विरोधात शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे लढत मोठी होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भास्कर भगरे हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचे घरही साधं आहे आणि साधा माणूस म्हणून ते या परिसरात परिचित आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिक्षक असलेल्या भगरे गुरुजींना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर लोकांनीच वर्गणी गोळा करून तयारी केली आहे. Lok Sabha Election

उमेदवारी जाहीर होताच त्यांचा आईचे आशीर्वाद घेतानाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांचे घरही दिसत आहे, त्यामुळे साधा माणूस आणि साधं घर अशी त्यांची सोशल मीडियातील टॅगलाईन झाली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

उमेदवारी जाहीर होताच वणी येथे महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्यात उपस्थित लोकांनी समोरचा उमेदवार पैशाने मजबूत असल्याने आम्ही वर्गणी देऊ असे सांगितले. नंतर काही वेळातच १००, २००, ५०० असे करत दहा लाखांची वर्गणी गोळा झाली. यामुळे त्यांची चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!